Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईगेवराई तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरुच

गेवराई तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरुच


गेवराई तालुक्यात नदी नाल्यांना पूर पुन्हा अनेक गावांचा संपर्क तुटला
लेंडी नदीच्या पुरामुळे रोहितळ गावात पाणी जातेगाव-गेवराई रस्ता बंद
विद्रुपा नदीचे पाणी रेवकी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत
गेवराई : (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत जोरदार पडत आहे. गेवराई तालुक्यात देखील पावसाने उच्चांक गाठला आसून परिणामी शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. काही ठिकाणी पुल खचले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते उखडून पडले आहेत. दरम्यान पावसाचा हा हाहाःकार सोमवारी रात्रभर सुरुच होता. या पावसाने रोहितळ येथील लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे रोहितळ गावात पाणीच पाणी झाले आहे तर पुल वाहून गेल्याने जातेगाव-गेवराई हा मुख्य रस्ता पूर्णतः बंद असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. इकडे गेवराई शहराजवळून गेलेल्या विद्रुपा नदीला महापूर आल्याने नदीकाठी असलेल्या रेवकी गावात पाणी शिरले आहे. याठिकाणी शाळा, तलाठी कार्यालय, तसेच रेवकी व देवकीला जोडणारा पुल पाण्यात गेला असून अनेक घरात पाणी शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून गावाचा पुर्णतः संपर्क तुटला आहे. तसेच तालुक्यातील भोजगाव, राजापूर, राहेरी आगर नांदूर, काजळवाडी यासह अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.


गेवराई तालुक्यात सोमवारी रात्री पाऊस धो-धो बरसला. सर्वदूर पडलेल्या या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये विद्रुपा नदीला महापूर आला आहे. तब्बल पंधरा ते वीस वर्षानंतर या नदीला ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान या नदीला आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका रेवकी या गावाला बसला आहे. नदीच्या पुराचे पाणी रेवकी गावात शिरले आहे. तसेच रेवकी देवकी ला जोडणारा पुल व गोंदीकडे जाणारा पुल पाण्यात गेल्याने गावाचा संपर्क तुटला असून गावातील शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय, मंदिर पाण्यात गेले असून गावातील अनेक घरात पाणीच-पाणी झाले आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!