Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडधारूरआपत्ती व्यवस्थापन समिती गायब आवरगाव येथील वाण नदीच्या पुलावरून कार गेली वाहून

आपत्ती व्यवस्थापन समिती गायब आवरगाव येथील वाण नदीच्या पुलावरून कार गेली वाहून


किल्ले धारूर (रिपोर्टर) धारुर तालुक्यातील आवडगाव येथून जाणार्‍या वा नदी ला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे येथील पुलावरून जाणारी काढ पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली आहे ही कार बाजूच्या शेतात अडकल्यामुळे यामध्ये असलेले तीन प्रवासी बालबाल बचावले आहेत त्यांचे नशीबच मोठे म्हणावे लागेल यातून मात्र आपत्ती व्यवस्थापन समिती गायब असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे


धारुर ते अंबाजोगाई रस्त्यावरील आवरगाव येथील वाण नदीला रात्री मोठा पुर आला असून अद्यापही पुलावरुन पाणी वाहत आहे. रात्री बीडहून लातूरकडे जाणारी चारचाकी गाडी एम एच 24 इङ1703 ही पाण्यात 200 मीटर वाहुन गेली असून सुदैवाने गाडीतील तिघांना वाचवण्यात आले आहे. सध्या आडस, अंबाजोगाईचा संपर्क तुटलेला असून सर्व वाहतूक बंद आहे. याबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे प्रशासनाने ज्या ज्या ठिकाणी पुलावर ती पाणी येत आहे अशा ठिकाणच्या अगोदरच नागरिकांना सतर्क करणे किंवा सोशल मीडिया सारख्या माध्यमातून माहिती देणे गरजेचे आहे परंतु प्रशासनाने याबाबत कुठलेही पावले उचलली नसल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!