आष्टीच्या शिराळा परिसरात आखत होते दरोड्याचा प्लॅन; आष्टी पोलीसांसह बीड पोलीसांनी घेराव
घालून केले जेरबंद; पिस्टल, धारदार शस्त्र जप्त; पाचजणांपैकी दोघे पळाले; एसपींची पत्रकार परिषद
बीड/आष्टी (रिपोर्टर):- हद्दीसह इतर जिल्ह्यात चोरी, घरफोडी, खुनासह दरोडा, यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांना अनेक वर्षांपासून गुंगारा देत ताकतीच्या बळावर दहशत निर्माण करत फिरत होता. रविवारी रात्री 11 च्या दरम्यान आष्टी पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर आटल्या ईश्वर भोसले वय वर्ष 32 याच्यासह , युवराज उर्फ धोड्या भोसले, मारुती उध्दव काळे यांच्या मुसक्या आवळल्या.तर दोघे पळवुन गेले.
कर्जत तालुक्यातील बेलगांव येथील रहिवाशी आटल्या ईश्वर भोसले वय वर्ष 32 हा सराईत गुन्हेगार असून आष्टीसह अहमदनगर, पुणे,बीड,सोलापुर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा,यासह अनेक जिल्ह्यात घरफोडी,खुनासह दरोडा,जबरी घरफोडी, यात तो मास्टर माईट होता. मागील चार वर्षापासून तो पोलिसांना हवा होता. अंगाने आडदांड असलेला आटल्या ताकतीच्या जोरावर गंभीर स्वरूपाच्या घरफोड्या करायचा. या अगोदर त्याच्यावर दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. अल्पवयीन असल्याने त्याला पुणे येथील बालसुधारगृहात ठेवले होते.पण तिथून तो पळाला होता.आष्टीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सय्यद शौकतअली यांनी त्याला 2018 साली श्रीगोंदा तालुक्यातुन जेरबंद केले होते. त्यानंतर काही दिवसांनी तो परत पसार झाला. मागील चार वर्षापासून तो पोलिसांना सारखा गुंगारा देत असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. रविवारी रात्री 11 च्या दरम्यान आटल्या आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत आसल्याची गोपनीय माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना मिळताच त्यांनी ठाण्यातील सहकारी सोबत घेऊन सापळा लावून रात्री उशिरा त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख,पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, पो.हा. सुंबरे, पो.ना. दराडे , पोलिस नाईक प्रवीण क्षीरसागर, पो. ना. हनुमंत बांगर,पो. शि. मजहर सय्यद, दिपक भोजे, पो.शि. शेख, पो.शि.. गुंडाळे, पो.शि. गायकवाड,पो.शि.पवळ, वाहन चालक उदावंत, दंगल नियंत्रण पथकातील जवान,याच्यासह पोलीस कर्मचार्यांच्या पथकाने केली. दरोड्याच्या तयारीत आलेला आटल्या पोलिसांनी गटवला. आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारी आलेल्या आटल्याला आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला गटवल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
पिस्टलसह घातक शस्त्रासह जेरबंद
पोलिसांनी सापळा लावून आटल्याला पकडले त्यावेळी त्याच्या कबरेला पिस्टल, व जवळ घातक शस्त्र आढळून आले.त्याच्यावर 150 गुन्हे विविध ठिकाणी दाखल असुन 60 गुन्ह्यात तो फरार होता. पोलिसांनी जिवाची बाजी लावत त्याला शस्त्रासह अटक केली असल्याचे आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
आटल्यावर
गंभीर गुन्हे
कुख्यात दरोडेखोर आटल्या भोसले याच्यावर राज्यभरातील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहे. चोरी, दरोडा, बलात्कार यासह खूनासारख्या घटनांना त्याने अंजाम दिलेला आहे. तब्बल 70 पेक्षा अधिक गुन्हे त्यावर दाखल आहेत. तो गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्याच्या जेलमधून पसार झाला होता. यातील 25 गुन्हे हे बीड जिल्ह्यात दाखल आहेत.
असा झाला थरार
आटल्या भोसले व त्याचा साथीदार आष्टी तालुक्यातल्या शिराळा परिसरामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आष्टी पोलीसांना झाली. आष्टी पोलीसांनी तात्काळ बीड पोलीसांची मदत मागितली, आरसीपीची एक तुकडी अन् आष्टी पोलीसांनी व्यूवरचना आकत या टोळीला घेरले. त्यावेळी एका दरोडेखोराने पोलीसांवर वार केला त्याच वेळी सशस्त्र पोलीसांनी बळाचा वापर करत आटल्या भोसले याला ताब्यात घेतले, अन्य चौघे पळण्याच्या तयारीत असतांना दोघाजणांच्या मुस्क्या बांधल्या मात्र दोघेजण पळू गेले. हा थरार तब्बल एक तास चालू होता. कर्तबगार पोलीसांनी ही मोठी कारवाई केली. याबाबत आज पत्रकार परिषद घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, आष्टीचे डीवायएसपी धाराशिवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष साबळे यांनी माहिती दिली.