पाच किलोमीटरपर्यंत ट्रॉफिक जाम
पात्रुड ; (रिपोर्टर) विज वितरण कंपनीच्या गलथान कारभार विरोधात पात्रुडकरांना खामगाव पंढरपूर राज्य महामार्ग वर 2 तास आंदोलन करण्यात आले आज रोजी पात्रुड येथुन जाणार्या खामगाव- पंढरपूर राज्य महामार्ग वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले पात्रुड गावाच्या लाईट विषयी प्रश्न गंभीर झाला असुन वारंवार धरणे , आंदोलने व उपोषण करुन सुद्धा महावितरण कसल्याच प्रकारची दखल घेत नसल्याने गावातील विज बाबतीत हाल होत आहे .सर्वच स्ट्रकचर वरिल डबे जळाले असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.म्हणुन गावातील सर्व आजी, माजी उपसभापती, व माजी सरपंच, उपसरपंच, आजी मा,ग्रा.पं. सदस्य. गावातील ग्रामस्थांच्या वतिने पात्रुड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पात्रुड माजी सरपंच अॅन्ड कजीम मनसबदार,उप सरपंच शेख युसूफ, माजी सरपंच एकनाथ मस्के, माजी सरपंच नजीर कुरेशी, माजी उपसभापती डॉ वसीम मनसबदार,माजी उपसभापती लतिफ मोमीन, माजी सरपंच जब्बार भाई, सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व पात्रुड ग्रामस्थ उपस्थित होते या आंदोलनाला मिटवण्यासाठी माजलगाव ग्रामीण चे पि,आय,शेवता खाडे यांनी मध्यस्थी करुन तेलगाव चे उप कार्यकारी अधिकारी मावळे,पात्रुड चे कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांनी लेखी स्वरूपात मागणी मान्य केली व आंदोलन रध करण्यात आले