Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवा, रिपाइंचे पुतळ्यासमोर धरणे आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवा, रिपाइंचे पुतळ्यासमोर धरणे आंदोलन

बीड (रिपोर्टर)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
   घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यात यावी, पुतळ्याचे याअगोदर सुशोभीकरण करण्यात आले मात्र त्यात मोठ्या प्रमाणात बोगसपणा झालेला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी. पुतळ्याभोवतीचे अतिक्रमण काढून त्याठिकाणी पोलीस चौकी सुरू करून परिसर सीसीटीव्हीच्या अंतर्गत आणण्यात यावी, या सह इतर मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली दरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी राजू जोगदंड, अविनाश जोगदंडसह आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!