Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमघाटसावळीत चोरट्यांचा धुमाकूळ घरं फोडून नगदी रक्कम पळविली

घाटसावळीत चोरट्यांचा धुमाकूळ घरं फोडून नगदी रक्कम पळविली

घाटसावळी (रिपोर्टर)- बीड तालुक्यातील घाटसावळी येथे रात्री चोरट्यांनी अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. लांडे वस्तीवरील घरात चोरी करून घरातील नगदी दहा हजार व इतर साहित्य पळविले. त्याचबरोबर घाटसावळीमध्येही एका गरात चोरी करून नगदी पाच हजार रुपये चोरून नेले.
   लांडे वस्तीवरील विलास अंधारे यांच्या घरी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी घरातील नगदी दहा हजार रुपये व इतर साहित्य चोरून नेले. त्यानंतर चोरट्यांनी घाटसावळी येथील सांय दैनिक बीड रिपोर्टर चे पत्रकार आनंद लांडे यांच्या घरी चोरी करून घरातील नगदी पाच हजार व एक किलो तुप चोरले. अन्य ठिकाणीही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या चोरीच्या घटनेने ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी चोरी करताना घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. 

Most Popular

error: Content is protected !!