Tuesday, January 25, 2022
No menu items!
HomeUncategorizedबीडच्या आरटीओ कार्यालयाचा कारभार सुधारणार की नाही ? अनागोंदी कारभार सुरुच, ‘जिल्हाधिकारी...

बीडच्या आरटीओ कार्यालयाचा कारभार सुधारणार की नाही ? अनागोंदी कारभार सुरुच, ‘जिल्हाधिकारी साहेब, लक्ष घाला’

बीड (रिपोर्टर)- बीडच्या आरटीओ कार्यालयामध्ये नेहमीच अनागोंदी कारभार होत आहे. या अनागोंदी कारभाराला प्रशासकीय पातळीवर रोख लावला जात नसल्याने येथील अधिकारी आणि कर्मचारी वाहनधारकांची प्रचंड प्रमाणात पिळवणूक करत आहेत. जिल्हाधिकारी यांनीच याकडे लक्ष घालून सदरील कार्यालयाचे स्टिंग ऑपरेशन करावे, आी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. त्यातच आरटीओ जयंत चव्हाण हे वाहनधारकांना अरेरावीची भाषा वापरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची माणगणी केली जात आहे.

s12


   आरटीओ कार्यालयामध्ये मागील पाच दिवसांपासून पासिंगच्या ट्रॅकवर वाहने पासिंग करण्याकरिता अधिकार्‍याची प्रतीक्षा करावी लागते. एक दिवस पाऊस होता, हे कारण पुढे करण्यात आले मात्र वाहनांना अपॉईंटमेंट असतानाही पासिंग करण्यासाठी पासिंग ट्रॅकवर अधिकारी हजर राहत नाहीत. येत्या काही दिवसांवर गळीत हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना पासिंग करणे गरजेचे असते. अशा गरजेच्या वेळी अधिकारी मात्र वाहनधारकांची अडवणूक करत आहेत.

पासिंगसाठी ट्रॅक्टर पाच-पाच दिवस वेटिंगवर ठेवले जात आहे. ऑनलाईनवर महिना-पंधरा दिवसांची वेटिंग असूनही पासिंगची अपॉईंटमेंट मिळत नाही. रोडवर वाहनधारकांकडून वसुली करण्यासाठी तीन-तीन अधिकारी उपस्थित असतात. वाहनधारकांची पासिंग करून द्यायची नाही व याच वाहनांना रोडवर अडवून वसूली केली जाते. अधिकार्‍यांकडून वाहनधारकांची जाणीवपूर्वक अडवणूक होत असून त्यांची आर्थिक लूट होत आहे. नव्याने आलेले आरटीओ जयंत चव्हाण हे तर आपल्याच तोर्‍यात असतात. त्यांनी वाहनधारकांना लुटण्याचा विडा उचललाय की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत असून ते कोणाला निट बोलत नाहीत. या सर्व कारभाराची दखल जिल्हाधिकार्‍यांनी घेऊन आरटीओ ऑफीसचे जिल्हाधिकार्‍यांनी स्टिंग ऑपरेशन करत आरटीओ चव्हाण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!