एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेची महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीला 18 आमदार उपस्थित होते. सरकारला कुठलाही धोका नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगत नाराजांची समजूत काढू, आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, भगव्याचे शिवसैनिक आहोत, असं म्हणत यातून लवकरच मार्ग निघणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.