Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडनुकसानग्रस्त शेतकरी रस्त्यावर, पैठण पुलाजवळ शेतकर्‍यांचा रस्ता रोको

नुकसानग्रस्त शेतकरी रस्त्यावर, पैठण पुलाजवळ शेतकर्‍यांचा रस्ता रोको

केज (रिपोर्टर)- चार दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने केज तालुक्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकर्‍यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत रस्ता रोको आंदोलन केले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.

d3


   चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे केज तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकारने तात्काळ मदत घोषीत करावी या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आज सकाळी पैठणच्या पुलाजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये आवसगाव, सावळेश्‍वर पैठण पात्रा, आनंदागव, जवळगाव यासह आदी गावातील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन महसूल प्रशासनाकडे देण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

Most Popular

error: Content is protected !!