Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी वाल्मिक कराडांना उधारीवर मागितलं!

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी वाल्मिक कराडांना उधारीवर मागितलं!

शिवबांवर जीव ओवाळून टाकणार्‍या मावळ्यांच्या बळावर छत्रपतींनी मराठी मातीत स्वाभिमानाचे स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य निर्माण करतांना जो संघर्ष करावा लागला तो संघर्ष मावळ्यांच्या जोरावर यशाचे ध्वज फडकवत गेला. ज्याच्या सोबत इमान राखणारा मैतर (मित्र) असतात तो स्वाभिमानाबरोबर यशाचा ध्वज कायम फडकवतो. हे मराठी मातीत निपाजलेल्यांना सांगण्याची गरज नाही. अशीच एक मैत्री दशकांपासून परळीत पहायला मिळते. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या मैत्रीच्या धाग्यातील धैर्याबरोबर संघर्षाची कहाणी ज्याच्या कानी तो या मैत्रीवर हुरळून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाल्मिक कराड यांचे तोंड भरून कौतुक करत वाल्मिक यांना मी माझ्यासोबत घेवून जातो असं म्हणत वाल्मिक यांच्या कामाची आणि मैत्रीचे तोंडभरून कौतुक केले.
त्याचे असे झाले, राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा परळीत आली. व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. समोर कार्यकर्ते पदाधिकार्‍यांची रेलचेल होती. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुंदर आखण्यात आले होते. अनेक मान्यवरांचे भाषणं झाल्यानंतर संवाद यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उठले. त्यांनी भाषणाला सुरूवात केली, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांचे नावे घेतली. शेवटचं एक नाव घेतांना जयंत पाटील म्हणाले, कार्यक्रमाचे किती सुंदर आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे नियोजन केले पण व्यासपीठावर बसले नाहीत ते वाल्मिक कराड! वाल्मिक कराडांना मी माझ्याकडे घेवून जातो, मला उधारीवर द्या असा माणुस बरोबर असणे ही बरीच मोठी उपलब्धी आहे. त्यांना घेवून जातो मी! पाटलांच्या या वाक्यावर व्यासपीठाखाली बलेल्या लोकांमधून आवाज आला. नग…नग… पाटील म्हणाले, मी पक्षाचा अध्यक्ष आहे. मी म्हणले तेच होईल, व्यासपीठासह उपस्थितांमध्ये प्रचंड हशा… सांगायचे तात्पर्य, वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करतात. कुठल्याही आयोजनात अथवा नियोजनात कसलीही कमतरता नसते. कधीही कुठे व्यत्यय आलेला नाही. परंतू हा माणुस कधीही व्यासपीठावर अथवा समोर नसतो. तेच जयंत पाटलांना आवडलं असावं आणि न राहून त्यांनी वाल्मिक कराड यांना घेवून जातो. म्हणत एक प्रकारे वाल्मिक कराडांचा सन्मानच केला. गेल्या 30-35 वर्षापासून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे सोबत आहेत. त्यांच्या मैत्रीची चर्चा अखंड महाराष्ट्रात होते. आज राजकारणामध्ये मैत्री आणि निष्ठा शोधून सापडत नाही. एकीकडे स्वार्थासाठी, सत्तेसाठी, पदासाठी जो तो एकमेकांच्या मुंडक्यांवर पाय देत स्वत:च्या मुंडक्यावर यशाची टोपी लावू पाहतोय. इथं मात्र केवळ आणि केवळ धनंजय मुंडे राजकारणात यशस्वी कसे होतेल? त्यांच्या यशामध्ये आपला खारीचा वाटा कसा राहिल? हे पाहत वाल्मिक कराड सातत्याने धनंजय मुंडेंच्या पाठिशी उभे राहत सांगितलेले अन् आवश्यक असलेले प्रत्येक काम अपडेट करतात. कोरोनाच्या कार्यकाळामध्ये दोन वेळेस मुंडेंना कोरोनाने ग्रासले. अशा परिस्थितीत मतदार संघात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, गोरगरीबांना अन्न धान्य कमी पडणार नाही याची दक्षता घेत धनंजय मुंडेंना जे हवं, त्यांच्या मनामध्ये काय आहे ते देण्याचे काम वाल्मिक कराड यांनी सातत्याने केले. आज राजकारणामध्ये कोण केंव्हा कोणासोबत गद्दारी करेल हे सांगता येत नाही. कोण कुठल्याही पक्षामध्ये किती दिवस राहिल हे ही सांगता येत नाही. परंतू अशास्थितीत तीन साडेतीन दशकापासून धनंजय मुंडेंसोबत राहणारे वाल्मिक कराड यांच्या निष्ठेचे कौतुक करावे तेवढे थोडे. आज धनंजय मुंडे सत्तेत आहे, परंतू गेल्या दशकातला धनंजय मुंडेंचा कार्यकाळ अत्यंत खडतर होता, अडचणीचा होता. समाजात जणू तो कार्यकाळ बहिष्करीत जाणवत होता. अशा भयावह काळात अनेक जणांनी इकडून-तिकडे उड्या मारल्या. परंतू वाल्मिक कराडांनी मैत्री आणि साथ सोडली नाही. जो संकाटाच्या काळी हात देतो, साथ देतो, खंबीरपणे पाठिशी उभा राहतो तोच खरा सखासोयरा आणि मित्र असतो. म्हणून का काय? वाल्मिक कराड यांना काही दिवसासाठी उधारीवर द्या असं मागणं आता अन्य राजकारण्यांकडून येवू लागलं आहे ते एवढ्यासाठीच. असा माणुस आपल्या सोबत असेल, आपल्या काफिल्यात असेल तर आपल्या काफिल्यातही निष्ठा, खरी मैत्री याचा वाण आणि गुणही लागेल. जयंत पाटलांनी वाल्मिक कराडांबद्दल काढलेले गौरोवोद्गार त्यांच्या मैत्रीला यशाच्या शिखरावर नेवून ठेवतात तेवढेच खरे. 

ReplyForward

Most Popular

error: Content is protected !!