Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडकेजकेज तालुक्यात महिलेच्या खून घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक दाखल

केज तालुक्यात महिलेच्या खून घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक दाखल

केज | रिपोर्टर
शेतामध्ये असलेल्या एका ४२ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याचा खळबळजण प्रकार आज दुपारी तालुक्यातील हादगाव डोका येथे घडला. घटनेची माहिती पोलिस उपअधिक्षक व केज पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेवून पंचनामा केला.
मिरा बाबुराव रनदिवे या महिलेला दगडाने ठेचून जिवे मारण्यात आले. याची माहिती पोलिस उपअधिक्षक व केज ठाण्याचे प्रदिप त्रिभुवन यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या घटनेने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली. महिलेचा खून कोणी आणि का? केला याचा तपास केज पोलिस करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!