Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमेघ गर्जनेसह जिल्ह्याच्या काही भागात पावसाचे थैमान

मेघ गर्जनेसह जिल्ह्याच्या काही भागात पावसाचे थैमान


शेतातील पिके केव्हाच उद्ध्वस्त; नगदी मदतीची शेतकर्‍यांना आशा

बीड (रिपोर्टर)- बीड शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात रात्री मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले. तुफान पावसामुळे बीड शहरातल्या अनेक वसाहती जलमय झाल्या. रात्री दहा वाजल्यापासून पावसाने जिल्ह्यातील विविध भागात हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटाने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या दशकभरात प्रथमच बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. आता शेतकरी केवळ सरकारकडे आशाभूत नजरेने नगदी मदतीची आशा करत आहेत.
गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात गुलाब चक्रीवादळाने निर्माण केलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मराठवाड्यात अक्षरश: ढगफुटीसदृश्य पावसाने थैमान घालून गेल्या आठवड्यातच मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांची शेती उद्ध्वस्त केली. शेतातील पिके पाण्यात गेले. जिल्ह्यात ओला दुष्काळ निर्माण झाला. एक दिवसाच्या उघडपीनंतर काल शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा बीड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. काही तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळू लागला. काही मिनिटात 50 मि.मी. पेक्षा जास्त पावसाने हजेरी लावली. रात्री तीन ते चार वेळेस बीड शहरात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहरातील विविध भाग जलमय झाले होते. मुसळधार पावसामुळे रात्री अनेक नद्या-नाल्यांना पुर आले. दशकभरामध्ये प्रथमच बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. यावर्षीच्या पावसाने शेती हिरावून नेली.


जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले
वाण धरणाचेही 8 दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये शुक्रवारी आणखी दमदार पाऊस झाल्याने आज सकाळी सात वाजता धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने गेट क्र. 10 ते 27 असे एकूण 18 गेट तीन फुंट उंचीवरून 4 फुट उंचीवर उघडले आहेत. त्याचबरोबर मांजरा धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले. गोदावरी आणि मांजरा नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला असून नदीकाठच्या गावकर्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सद्यस्थितीमध्ये गोदावरी नदी पात्रात एकूण 89 हजार 604 क्युसेस पाण्याचा विसर्ग वाढला. शुक्रवारी मध्यरात्री पैठण तालुक्यासह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शनिवारी सकाळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व शाखा अभियंता विजय काकडे यांनी आपत्कालीन 1 ते 9 क्रमांकाचे दरवाजे विसर्ग करण्यासाठी वगळण्याचा निर्णय घेतला. 89 हजार 604 क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आला आहे. जायकवाडी धरणाचे सर्वच 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरवाजा क्र. 10 ते 27 हे दरवाजे 4 फुट उघडण्यात आले. आपत्कालीन 9 दरवाजे क्र. 1 ते 9 हे 1.5 फुट उघडण्यात आले. या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी आता दुथडी भरून वाहत आहे. सध्या या धरणामध्ये 89 हजार 232 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची 99.62 टक्केवारी झाली. एकूण जिवंत पाण्याचा साठा 2162.577 द.घ.मि. आहे. पाण्याची आवक कमी-जास्त प्रमाणात सुरू असून जायकवाडी धरणातून आज सकाळी सात वाजता गेट क्र. 1 ते 9 असे एकूण 9 गेट झिरो फुटावरून 1.5 फुट उंचीवर उघडण्यात येणार आहेत. अशा प्रकारे 14 हजार 148 क्युसेस पाण्याचा विसर्ग ागेदावरी नदी पात्रात वाढून 89604 क्युसेस विसर्ग सुरू ठेवण्यात येणार असून 1 ते 9 असे एकूण 9 आपत्कालीन गेट 1.5 फुट उंचीने उघडण्यात आले आहे तर 10 ते 27 असे एकूण 18 गेट 4 फुट उंचीने उघडण्यात आले आहेत. दरम्यान मांजरा नदीमध्येही पाण्याचा विसर्ग वाढला असल्याने या धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!