Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडवाळू उपसा करणार्‍या केणीसह ट्रॅक्टर जप्त

वाळू उपसा करणार्‍या केणीसह ट्रॅक्टर जप्त


बीड (रिपोर्टर)ः- गोदा पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यासाठी घेवून जाणारी केणी तलाठ्यांनी जप्त करुन गेवराई पोलीसांच्या स्वाधीन केली. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यासाठी ट्रॅक्टर (क्र.एम.एच.21. ए.डी.5396) व तिच्या पाठीमागे वाळू उपसा करण्यासाठी केणी घेवून जात असतांना म्हाळसा पिंपळगांव फाटा येथे तलाठी किरण प्रभाकर दांडगे यांनी टॅ्रक्टरचा पाठलाग केला. यावेळी चालकांने ट्रॅक्टर व केणी सोडून पळ काढला. तलाठ्यांनी ते ताब्यात घेत गेवराई पोलीसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी तलाठी दांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलीसात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!