Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला ओळख पटवण्यासाठी आष्टी पोलिसांचे प्रयत्न सुरू

कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला ओळख पटवण्यासाठी आष्टी पोलिसांचे प्रयत्न सुरू


आष्टी (रिपोर्टर)-आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण हद्दीमध्ये आश्रम शाळेजवळ पुरामध्ये 4-5 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे नदीला पूर आला होता.त्या पुरा मध्ये मृत्य कुजलेल्या अवस्थेत मध्ये 4 ते 5 दिवसांचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा मृतदेह प्रथम गुराखी गुरे चारत असताना पहिला व एकच खळबळ उडाली ही माहिती कळताच आ. सुरेश धस यांनी पोलिस प्रशासन, तहसीलदार यांना सूचना दिली व पोलिस प्रशासन यांनी तात्काळ घटनस्थळी धाव घेतली.


मृतदेह 4 ते 5 दिवसांपूर्वीचा असल्यामुळे शोधण्यासाठी थोडा अडथळा निर्माण झाला पोलिस अधिकारी पी. एस.आय काळे, गर्जे, राख,डॉ.गिरी , अफसर शेख,सांगवी पाटण येथील शत्रुघ्न बापू मरकड,सरपंच दत्तात्रय खोटे, उपसरपंच अमोल खिलारे, पत्रकार समीर शेख, कारखेल येथील सरपंच संजय जाधव,सरपंच दत्तू जाधव,महेश खिलारे,रोहन वाघमारे , सोनू खंडागळे, रोहित खंडागळे, आंकुश जाधव. पप्पू खंडागळे, सांगवी पाटण , कारखेल , तांडा येथील 40 ते 50 युवकांनी मदत केली. व मयताची ओळख न पटल्यामुळे आरोग्य केंद्राची गाडी घटनास्थळी आली डॉ. गिरी अफसर शेख आले व मयताला पुढील कार्यवाही साठी रात्री 12 च्या सुमारास धामणगांव आरोग्य केंद्र येथे शव विच्छेदन करण्यासाठी साठी पाठविण्यात आले असून पुढील तपास पी.एस.आय. काळे, गर्जे, राख हे करत आहेत.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून पॅन्ट शर्ट घातलेली आहे.उंची साधारण 5 फुट आहे.दाढी थोड्या प्रमाणात वाढलेली असून वय अंदाजे 40 ते 50 असून ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून लवकरात लवकर ओळख पटवणे गरजेचे आहे.मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे.यामुळे अंत्यसंस्कार करण्यास उशीर करता येणार नाही पोलिस ओळख पटवण्यासाठी संपर्क करत असून नागरीकांनी ही सोशल मीडियावर मॅसेज टाकावेत जेणेकरून ओळख पटण्यास मदत होईल

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!