Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडउद्यापासून शाळा सुरू होणार

उद्यापासून शाळा सुरू होणार

ग्रामीण भागात ११४६ तर शहरात २५५ शाळांचे कुलूप उघडणार
बीड (रिपोर्टर)ः- कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला. उद्या राज्य भरातील शाळा सुरू होत आहे. पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होत आहे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ११४६ तर शहरातील २५५ शाळांचे कुलूप उघडण्यात येणार आहे. शाळाचा वेळेत दोन तासाची कपात करण्यात आली आहे. सदरील शाळा वर्गनिहाय एकदिवसा आड भरवण्यात येणार आहे.


कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभरातील शाळा बंद आहे. शाळा कधी सुरू होणार याची उत्सुकता मुलांसह पालकांना लागून होती. ऑनलाईन शिक्षण पध्दत ही तितकी प्रभावी ठरली नाही. ग्रामीण भागातील फक्त पंधरा ते विस टक्क्यापर्यंंत ऑनलाईन शिक्षण पोहचलं आहे. गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हे नुकसान भरुन न निघणारं आहे. कोरोनाचा संसर्ग सध्या कमी झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा उघडण्याबाबत निर्णय घेतला. उद्या काल ४ ऑक्टोंबर पासून पाचवी ते बारावी पर्यंत शाळा उघडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील ११४६ तर शहरातील २५५ शाळाचे कुलूप उघडणार आहे. शाळा सुरू करतांना शिक्षण विभागाने काही नियमावली ठरवून दिलेल्या आहे. त्या नियमानूसार शाळा सुरू करण्यात येणार आहे. एक दिवसाआड वर्ग भरवण्यात येणार आहे. एका टेबलावर एक विद्यार्थी बसणार आहे.
जि.प. शाळा झाडा झुडुपात दिसेना
दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने जि.प. शाळांना उतरती कळा आली. बहुतांश शिक्षक शाळेकडे फिरकलेच नाही त्यामुळे शाळेतील वर्ग खोल्या प्रचंड प्रमाणात घाण झाल्या काहीत खोल्यात गवत उगवले. शाळेच्या भोवती झाडे झुडपे उगवले आहे. ही झाडे झुडपे अजुन तरी तसीच होती. शाळा बाबत शिक्षकांना, शालेय समीती आणि सरपंचांना किती काळजी आहे यावरुन दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!