Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमफौजदार पवार यांच्याकडून पुजाराला बेदम मारहाण

फौजदार पवार यांच्याकडून पुजाराला बेदम मारहाण

पीएसआय पवार यांच्या विरोधात गावकरी आक्रमक माफी मागितल्या नंतर ग्रामस्थांची माघार

गेवराई (रिपोर्टर) राम मंदिराचे पुजारी यांनी मंदिरासमोर लघुशंका का करतो म्हणून पोलीस पवार यांच्या मुलाला विचारले याचा राग मनात धरून फौजदार पवारांनी रात्री पुजाऱ्याच्या घरी जाऊन त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार दि.2 रोजी रात्री दहा वाजता चकलांबा येथे घडली. या घटनेने गावात प्रचंड संताप झाला असून गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन फौजदार पवारांनी पुजाऱ्याची माफी मागावी नसता त्यांची बदली करावी या मागणीसाठी रविवारी दि.3 रोजी सकाळी चकलांबा पोलीस स्टेशन मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान पीएसआय पवार यांनी पुजारी देशपांडे व ग्रामस्थांची माफी मगितल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली असल्याचे सांगण्यात आले. या मारहाणीच्या घटनेमुळे चकलंबा येथील वातावरण चांगलेच तापले होते. सर्वच ग्रामस्थांकडून पोलिस प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. याबाबत अधिक अधिक माहिती अशी की येथील फौजदार पवार यांचा मुलगा शनिवार दि.2 रोजी राम मंदिर परिसरात लघुशंका करत होता. त्यामुळे राम मंदिराचे पुजारी गणपत देवा देशपांडे यांनी त्याला मंदिरासमोर लघुशंका करू नको व लघुशंका करण्यास मज्जाव केला. यामुळे पवार यांच्या मुलांनी ही घटना फौजदार पवार यांना सांगितली. याचा राग मनात धरून फौजदार पवार यांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता मंदिराचे पुजारी गणपत देवा देशपांडे यांच्या घरी जाऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेने गावक-यात प्रचंड संताप व्यक्त करत पवार यांनी पुजाऱ्यांची माफी मागावी नसता पवार यांची बदली करावी या मागणीसाठी पोलीस स्टेशनला गावकऱ्यांनी रविवार दि.3 रोजी ठिय्या मांडला होता. या घटनेमुळे गावक-याकडून पोलीस प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात आसून संबंधित अधिकाऱ्याने माफी मगितल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली.

Most Popular

error: Content is protected !!