Monday, January 24, 2022
No menu items!
Homeसंपादकीय‘स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत गांधींची अहिंसा शुरांची कशी’ यावर भाष्य करणारे मॅराथॉन अग्रलेख भाग...

‘स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत गांधींची अहिंसा शुरांची कशी’ यावर भाष्य करणारे मॅराथॉन अग्रलेख भाग ३ ‘गांधींचे तुकाराम’


गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०
न्याय, निती, सत्य, त्याग, संघर्ष आणि यशाची जडणघडण कुठे होत असेल तर ती महाराष्ट्रात. हे सत्य सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आणि खरे आहे. अखंड जगाला भूगोल आहे, परंतु भुगोलाबरोबर इतिहास असणारा एकमेव भारत देश आहे आणि या भारत देशातल्या इतिहासाच्या पुस्तकातले सुवर्णपान ते महाराष्ट्राच्या संघर्षमय, नितीमय इतिहासाचे समाजकारण आणि राजकारणाचे म्हणावे लागेल. म्हणूनच आजपावेत या देशात जे संत-महंत, समाजसुधारक होऊन गेले त्यांना महाराष्ट्राची भुरळ पडत राहिली. महात्मा गांधी हे तेव्हा महात्मा झाले, जेव्हा त्यांच्यावर संस्कार पडत गेले. आपल्यावर पडणारे संस्कार रिसवण्या आणि पचवण्याआधी कापडासारखे उडून जाणार नाही याची दक्षता जो घेतो तो संस्कारशील इतिहास घडवू शकतो आणि तोच इतिहास महात्मा गांधींनी घडवून दाखविला. गांधी किती चांगले, हे सांगण्याची गरज नाही, परंतु गांधी किती वाईट हे सांगण्याचा खटाटोप स्वातंत्र्यपूर्वीपासून ते आजपावेत सुरू असल्याने आणि त्यांच्या हत्येची मळभ महाराष्ट्राच्या माथी नथ्थूरामच्या नावे लागल्याने हे सांगावेसे वाटते. महाराष्ट्राचं ते दुर्दैव. जो महाराष्ट्र सत्यासाठी, नितीसाठी, न्यायासाठी खंबीरपणे उभा राहतो, त्यागामध्ये सर्वात आघाडीवर असतो, संघर्ष करण्याची धमक ज्याच्या तना-मनात आहे आणि यशस्वी होण्याची उर्मी ज्याच्या अंगात आहे त्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाने गांधींची हत्या केली. हा दाग पुसला जाणारा नसला तरी महात्मा गांधींना
महात्मा बनवणारे
कोण असतील हे आजच्या पिढीला माहित नाही. स्वत: महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखलेंना आपले गुरू मानत असले तरी महात्मा गांधींच्या उभ्या आयुष्यावर आणि त्यांच्या अहिंसेवर प्रभाव होता तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा. महात्मा गांधींच्या बाबतीत जे घडलं तेच तुकोबांच्या बाबतीतही घडलं. तुकारामांनाही वेदना आणि भोळा दाखवून टाळ कुटण्या मर्यादीत ठेवण्याहेतू महाराष्ट्राच्या धर्म मार्तंडांनी प्रयत्नाची परिकाष्ठा केली. गांधींना तर शिव्या शाप देत बदनामीचा आजपावेत या धर्म मार्तंडांनी जणू विडाच उचलला. परंतु आम्ही आधीही सांगितले आणि आताही सांगतो, येसूखिस्तानंतर तब्ब दोन हजार पेक्षा जास्त वर्षांनी भारत देशात गांधींसारख्या अहिंसावादी व्यक्तीचा जन्म झाला. गांधी काय जन्मजात महात्मा नव्हते. ते बुद्धांप्रमाणे, जगद्गुरू संत तुकारामांप्रमाणे लहानपणापासून संत वा महात्मा नव्हते तर जसा जसा अनुभव येत गेला, वेगवेगळ्या समाज सुधारकांचे, संत-महात्म्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडत गेला, तशी-तशी महात्मा गांधींच्या जीवनाला कलाटणी मिळत गेली. महात्मा गांधींना महात्मा बनवण्यामध्ये तुकाराम महाराजांच्या विचारांचा खारीचा वाटा नव्हे तर सर्वाधिक वाटा म्हणावा लागेल. म्हणून गांधींना तुकारा प्रिय होते.
‘गांधींचे तुकाराम’
यावर भाष्य करताना महात्मा गांधींना तुकारामांच्या चरित्राचे आणि गाथ्याचे चिंतन-मनन आणि वाचन करायचे होते. तुकोबांच्या प्रत्येक अभंगाचा अर्थ समजून घ्यायचा होता. वेळेअभावी गांधींना ते करता आले नाही. परंतु येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधींनी तुकोबांचे एक नव्हे तर सोळा अभंग इंग्रजीमध्ये भाषांतर केले. गांधींनी जे तुकोबांचे अभंग निवडले त्यावर गौतम बुद्ध, जगद्गुरू तुकाराम महाराज तद्नंतर महात्मा गांधी यांची विचारसरणी एकमेकांच्या प्रभावाखाली पहावयास मिळते. १६ ऑक्टोबरला महात्मा गांधींनी आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रामध्ये ज्या अभंगाचा उल्लेख केला तो अभंग वाचल्यानंतर आणि चिंतन-मनन केल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे गांधीजींच्या तीन माकडांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तर म्हणू, महात्मा गांधींचे जे तीन माकडे आज जगासमोर आहेत, ‘वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका’ ते तुकोबांच्या अभंगांतूनच आले आहेत. तुकोबांचा तो अभंग
पापाची वासना नको दाऊ डोळा…
त्याहुनी आंधळा बराच मी…
निंदेचे श्रवणी नको माझ्या कानी…
बधिर करुणी ठेव देवा…
अपवित्र वाणी नको माझ्या मुका….
त्याजहुनी मुका बराच मी…
मज नको कधी परस्त्री संगती…
जनातून माती उठता भली….
तुकोबांच्या या अभंगाने गांधींवर एवढा प्रभाव पाडला की त्यांनी आपल्या जिवनामध्ये वाईट ऐकण्या, बोलण्या आणि पाहण्यावर बंधने तर घातलीच उलट लोकांनाही ते सांगत राहिले. तुकाराम महाराज म्हटले की,
भागवद् धर्माची पताका
डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. संत नामदेवांनी भागवद् धर्माची पताका अटकेपार लावली. संपूर्ण भारतभर त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीची मोहर उमटवली. गुजरातही त्याला अपवाद नव्हता. गुजरातमधल्या वैष्णव संतांवर संत नामदेवांचा प्रभाव होता. संत कवी नरसी मेहतांच्या काव्यात संत नामदेवांचा उल्लेख सातत्याने येतोच. त्यामुळे गांधीजींनी तुकोबाची गाथा हाती घेतली. तुकारामांचा प्रभाव गांधींवर एवढा होता की १९४० च्या आधी तुकारामांचे चरित्र असलेल्या एका पुस्तकाला गांधींची प्रस्तावना आहे. त्यामध्ये गांधी म्हणतात, ‘तुकाराम मुझे बहुत प्रिय है,’ महात्मा गांधींनी जे १६ अभंग इंग्लिशमध्ये भाषांतरीत केले त्या अभंगात प्रत्येक माणसाच्या जिवनावर प्रभाव टाकणारे. त्यातला ‘जे काय रंजलेगांजले, त्यासी म्हणे आपले’, हा अभंग तर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मुखावर आपल्याला पहावयास मिळतो. त्यानंतर तर दुसरा अभंग हा ‘महाराशी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित काही देह त्याग करिता नाही, ‘नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ’ हा अभंग गांधींनी आपल्या जवळ घेऊन तुकोबांची जी भूमिका आहे तीच भूमिका आपली असल्याचे दाखवून दिले. नाही संत मिळते ही हाटीं | हिंडता कपाटी रानींवनीं ॥ या अभंगाचा सार पहात असतानाच ‘पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती’ या अभंगातून भारत देशातल्या अठरापगड जातींच्या संतांना तुकोबांनी ज्या एका अभंगात गुंपले आहे, तसेच अखंड हिंदुस्तानाला जात-पात-धर्म- पंथाच्या भेदातून एका माळेत गुंफण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले असावेत. ‘पवित्र तो कुळ पावन तो देश’ हा अभंग महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाने वाचले आणि त्याचे चिंतन-मनन केले तर जात-पात-धर्म-पंथ, मंगल-अमंगल, छूत-अछूत, गरीब-श्रीमंत याच्यातले भेद नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. ‘वेद अनंत बोलला, अर्थ इतकाच शोधला’ हा अभंग असेल अथवा ‘पुण्य पर उपकार पाप ती पिडा’ या अभंगापासून ते शेवटची विनवणी ‘संतजनी परशिवा’ या अभंगापर्यंत ‘हेचि दान देगा देवा तुझा विसर ना होवा’ इथपर्यंत तुकोबांचे माणसाबद्दल जात-पात-धर्माबद्दल, समाजाबद्दल आणि स्वत:बद्दलचे सर्वकाही सांगून जाते आणि तेच गांधींना या अभंगात आवडले, म्हणून तर त्यांनी येरवडा कारागृहामध्ये या अभंगाचे भाषांतर केले.
कोण म्हणतं
गांधी नेभळट?

महात्मा गांधींच्या अहिंसेला नेभळटपणा म्हणून हिनवण्यात येतं. या गालात मारल्यानंतर दुसरा गाल पुढं करण्याची अहिंसावादी भूमिका गांधींनी घेतल्याचे म्हटले जाते, परंतु दुसरा गाल पुढं करा हे गांधींनी कधी म्हटलेच नव्हते. ती तर येशूची शिकवण होती हे बहुतांश जणांना माहितच नाही. गांधी जेवढे अहिंसावादी होते तेवढेच या देशावर आक्रमण झाल्यानंतर वैयक्तिक जीवनातील अहिंसा वेगळी आणि राष्ट्रासाठी अहिंसा सोडून शस्त्र हाती घेणे महत्वाचे ही भूमिका जेव्हा पाकिस्तानने जम्मू-काश्मिरवर हल्ला चढवला तेव्हा घेतलीच होती ना. तुकोबांनाही असच बदनाम केलं गेलं, परंतु ‘भले तरी देऊ काशीची लंगोटी…’ म्हणणारे तुकोबा वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा’, हे बोलून तुकोबांनी आपला आक्रमकपणा दाखवलाच आहे तसेच गांधीही नेभळट नव्हतेच.

Most Popular

error: Content is protected !!