Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआजपासून शाळा झाल्या सुरू विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; शिक्षण विभागाचे योग्य नियोजन

आजपासून शाळा झाल्या सुरू विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; शिक्षण विभागाचे योग्य नियोजन


बीड (रिपोर्टर):- हो, नाही, हो, नाही करत आज अखेर तब्बल दीड वर्षानंतर राज्यासह बीड जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजली असून शहरासह ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत शाळेतत उपस्थित राहिले. गेल्या आठ दिवसापासून जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी शाळा उघडण्यासाठी नियोजन करत होते त्यांच्या योग्य नियोजनामुळे शिक्षकासह विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेत उपस्थित होते.


जिल्ह्यातील पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत उपस्थित राहत असतांना शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळा पुर्ण र्निजंतुकीकरण करून विद्यार्थ्यांना मास्क आहेत की नाही? ज्या विद्यार्थ्यांनी मास्क आणले नाही त्या विद्यार्थ्यांना शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीने मास्क उपलब्ध करून दिले. पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्ग आणि तुकड्यांचे एक दिवसाआड उपस्थितीचे नियोजन करणे. एका बँचवर एकच विद्यार्थी बसला पाहिजे याच्याही सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारूक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी सर्व शाळांना दिल्या होत्या. आज अखेर शहरासह बीड जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या बहुतांश शाळा उघडल्या होत्या. शहरातील शिवाजी विद्यालय, चंपावती विद्यालयासह अनेक शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. शाळातील वातावरण उत्साहवर्दक होते तर पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळातील विद्यार्थीही पन्नास टक्क्याच्या आसपास उपस्थिती होती. उद्या ही उपस्थिती वाढेल अशा अनेक शाळांना भेटी दिल्यानंतर शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांनी सांगितले. दोनही शिक्षणाधिकारी यांनी शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळांना भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी शिक्षकांना काही सूचना केल्या. बहुतांश शाळा विद्यार्थ्यांनी भरलेल्या होत्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!