Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडनुकसान भरपाई च्या मागणीसाठी किसान सभा करणार सोमवारी परळीत आंदोलन

नुकसान भरपाई च्या मागणीसाठी किसान सभा करणार सोमवारी परळीत आंदोलन


परळी (रिपोर्टर)- दोन दिवसापुर्वी झालेल्या अतीवृष्टीमुळे पिकासह शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना तात्काळ आर्थीक मदत करावी यामागणीसाठी सोमवारी (ता.४) परळी उपविभागीय कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याची माहीती कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.


शेतकर्‍यांचे अतीवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासन व सरकारने तात्काळ सरसकट शेतकर्‍यांना मदत द्यावी या मागणीसाठी अखील भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमेटी शेतकर्‍यांना सोबत घेउन परळी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी (ता.३०) तीव्र निदर्शने करणार आहे. या आंगोलनात शेतकर्‍यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन माकप चे सचिव मंडळ सदस्य कॉ पी एस घाडगे, किसान सभेचे कॉ अजय बुरांडे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ सुदाम शिंदे, कॉ राधाकिसन जाधव यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!