Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडअमरण उपोषण करणारी महिला झाडावर चढून बसली शिवाजीनगर पोलीसांच्या विनंतीनुसार महिला खाली...

अमरण उपोषण करणारी महिला झाडावर चढून बसली शिवाजीनगर पोलीसांच्या विनंतीनुसार महिला खाली उतरली


पतीच्या मृत्यू प्रकरणी दोषीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महिलेचे आंदोलन
बीड (रिपोर्टर):- जमिनीचा मावेजा न मिळाल्याने एका शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील दोषी अधिकार्‍या-विरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मयत शेतकर्‍याची पत्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 ऑक्टोंबरपासून उपोषणास बसली आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लिंबाच्या झाडावर चढून बसली होती. घटनची माहिती शिवाजीनगर पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून महिलेस विनंती केल्यानंतर महिला झाडावरून खाली उतरली.


जमिनीच्या मावेजासाठी पाली येथील अर्जुन कुंडलीक साळुंके या शेतकर्‍याने गेल्या काही महिन्यापूर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी दोषी विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत शेतकर्‍याची पत्नी तारामती साळुंके हीने वेळोवेळी केली. याबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे निवेदनही देण्यात आले होते. मात्र कारवाई होत नसल्याने ही महिला 2 ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसली. उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आज सकाळी महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या झाडावर चढून बसली होती. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर शिवाजीनगर ठाण्याचे प्रमुख साईनाथ ठोंबरे, शेख सह आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीसांनी विनंती केल्यानंतर महिला झाडावरून खाली उतरली. याबाबत प्रशासन आणि उपोषणकर्त्या महिलामध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!