Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडशिरूरशाळा उघडल्या पण बस सेवा सुरु नसल्याने विद्यार्थी अडचणीत

शाळा उघडल्या पण बस सेवा सुरु नसल्याने विद्यार्थी अडचणीत


शिरूर कासार (रिपोर्टर)- महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री यांनी नुकतीच चार ऑक्टोबर पासुन राज्यातील शाळा सुरू केल्या मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस सेवा बंद असल्याने येण्या-जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असून बहुतांशी ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये जा करत असून त्यांची अडचण लक्षात घेऊन तात्काळ बस सेवा सुरु करावी अशी मागणी होत आहे.बससेवा सुरु नसल्यामुळे आजही ते शाळे पासुन दुरच असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे

यासाठी अगोदर राज्यातील सर्व आगार प्रमुखांना सूचना देऊन ग्रामीण भागातील एसटी बसेस सुरू करण्यात याव्यात आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना असलेले शाळेचे पास व विद्यार्थिनींना असलेले एसटी बसची मोफत पास याची सोय अगोदर करायला हवी अशी ग्रामीण भागातील लोक करू लागले आहेत. शाळा सुरू करण्या अगोदर बस सेवा सुरु करण्याचे धोरण शासनाने आखायला हवं होतं परंतु तसे न करता शाळा सुरू करून आज एक प्रकारची अडचणच विद्यार्थ्यांना निर्माण केली असल्याचे मत पालक वर्गातून ऐकवयास मिळत आहे काल सुरू झालेल्या शाळेमध्ये यामुळे केवळ 35 टक्के विद्यार्थी उपस्थित राहिल्याने सर्वत्र पाहायला मिळाले असल्याचा आव्हाल शिरूर कासार चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी नुकताच प्रसिद्धीला दिला आहे त्यामुळे या शाळा सुरू झाल्या काय आणि नाही झाल्या काय याचा ना परिणाम शिक्षकांवर पडणार ना प्रशासनावर तेव्हा मायबाप मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व आगार प्रमुखांना बोलावून बैठकीद्वारे ग्रामीण भागातील एसटी बसेस सुरु करा अशा सूचना देण्यात याव्यात अशी मागणी बहुतांश नव्हे तर सर्व पालक वर्गातून केली जात आहे पहिल्या लोक डाउन च्या काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड ते शिरूर कासार ही एसटी बस बंद करण्यात आली होती जवळपास 60 ते 70 वर्षापासून चालू असणारी ही गाडी आज गेल्या लाकडाउनपासून मध्ये जवळपास वीस महिन्यापासून बंद असून त्या भागातील भडकेल कोतंन अमळनेर जाटनांदूर वडळी चाहुरवाडी सवसवाडी सिंदफणा गोमळवाडा रुपुर कोळवाडी आधी पंधरा ते वीस गावातील विद्यार्थ्यांची संख्या मात्र रोडावली असल्याकारणामुळे शाळेमध्ये कमी उपस्थिती दिसून येत आहे. त्यासाठी जामखेड आगार प्रमुखांनी या मागणीचा विचार सहानुभूती पूर्वक विचार करावा असे आवाहन पालक व जनमाणसातून करण्यात आले आहे

Most Popular

error: Content is protected !!