Monday, January 24, 2022
No menu items!
Homeराजकारणजिल्हा परिषदेच्या पोटंनिवडणुकीत काट्याची टक्कर 85 जागांपैकी 61 जागांचा निकाल हाती

जिल्हा परिषदेच्या पोटंनिवडणुकीत काट्याची टक्कर 85 जागांपैकी 61 जागांचा निकाल हाती


भाजपा 16, शिवसेना 9, राष्ट्रवादी 11, काँग्रेस 11 जागांवर विजयी
धुळे, नंदूरबार, पालघर, नागपूर, अकोल्यात समर्थकांचा जल्लोष

वाशीम/अकोला (रिपोर्टर)- राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये 5 ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीची मतमोजणी आज होत असून मिनी विधानसभा समजल्या जाणार्‍या या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची करत ताकत लावली होती, त्यामुळे राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून असून नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशीमच्या जिल्हा परिषदांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 जागा आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी निकाल घोषीत होत आहेत. हाती आलेल्या निकालानुसार आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 16 जागांवर भाजपा, 9 जागांवर शिवसेना, 11 जागांवर राष्ट्रवादी तर 11 जागांवर काँग्रेस विजयी झाली असून या निवडणुकीत काट्याची टक्कर दिसून येत आहे.
कोरोनासह न्यायालयाने रद्द केलेल्या ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका अखेर झाल्या. 85 जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात तर 144 पंचायत समितीच्या मतदारसंघात मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सकाळपासूनच नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशीम जिल्ह्यात काट्याची टक्कर पहायला मिळाली. अकोल्यात बहुजन वंचितची आघाडी दिसून आली. याठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी मागे पडल्याचे चित्र होते. तर नंदूरबारमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता कायम राहिली असून भाजपाची या ठिकाणी पिछेहाट झाली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसला असून बच्चू कडुंच्या प्रहारने त्यांच्या गावामध्ये एन्ट्री केल्याचे दिसून येते. दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेल्या एकूण जागांच्या निकालामध्ये 61 जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपा 16, राष्ट्रवादी 11, काँग्रेस 11, शिवसेना 9, इतर 14 जागांवर विजयी झाले आहेत. सदरची निवडणूक ही सर्वच पक्षांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती.

Most Popular

error: Content is protected !!