Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडवडवणीवडवणी तहसिल कार्यालयावर शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा

वडवणी तहसिल कार्यालयावर शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा


वडवणी (रिपोर्टर):- मागील दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकाचा सारांश शतानाश झाला असुन वडवणी तालुका ओला दुष्काळ जाहिर करावा तसेच हेक्टरी 50 हजाराची मदत करावी यासह अन्य मागण्यासाठी आज सकाळी वडवणी तहसिल कार्यालयावर शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.


सदरील मोर्चा आज सकाळी ठिक 11 वाजता वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालयावर शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश भव्य मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी होत सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा व हेक्टरी 50 हजार रुपायची नुकसान भरपाई देण्यात यावी,उसाची एफआरपीचे तुकडे न करता एक रकमी रक्कम देण्यात देण्यात यावी,सोयाबीन प्रती क्विटल 10 हजार रु.दराने शासनाने खरेदी करावी,महात्मा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत माफी पासून वंचीत राहिलेल्या शेतकर्याचे कर्जमाफी करून दुबार पीककर्ज देण्यात यावे,मागील वर्षी गाळप झालेल्या उसाचे प्रती टन 200 रु . प्रमाणे रक्कम देण्यात यावी.यासह अन्य मागण्याचे निवेदन देण्यात आले.या आक्रोश मोर्चात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते सह शेकडो शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.तर सदरील मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे.शासनाकडून मागण्या मान्य करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चा आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी करण्यात आली होती.

Most Popular

error: Content is protected !!