बीड (रिपोर्टर): बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनावरे चोरून त्याची वाहतूक करणार्या दोघांना स्थानीक गुन्हेशाखेने जेरबंद केले असून बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जनावरांची चोरी करून त्याची वाहतूक होत असल्याची माहितीपोलिसांना मिळताच पोलिसांनी टेम्पो अडवला होता. जनावरे आणि टेम्पो तेथेच सोडून चोरटे फरार झाले होते. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसात गु.र.नं. 244/ 2023 नुसार कलम 379 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपी व्हीआयपी लॉन्स बीड येथे असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक पाठवून रात्री शेख युनुस शेख युसुफ (वय 26), शेख रईस शेख युसुफ (वय 21) रा. सिरसदेवी ह.मु. व्हीआयपी लॉन्स, बीड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, एलसीबीचे प्रमुख संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय तुपे, एएसआय तुळशीराम जगताप, भागवत शेलार, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, नसीर शेख, राहुल शिंदे, चालक गणेश मराडे यांनी केली.