Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमकालिका नगरमधील शिक्षकाचे घर फोडले

कालिका नगरमधील शिक्षकाचे घर फोडले


बीड (रिपोर्टर)- शहरातील कालिका नगर भागातील एका शिक्षकाचे अज्ञात चोरट्याने घर फोडून घरातील कपाटात ठेवलेले 40 हजार रुपये चोरून नेल्याची घटना सोमवारी घडले असून या प्रकरणी शिक्षकाने काल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

अनिल जगन्नाथ सानप (वय 32 वर्षे, रा. कालिका नगर ) या शिक्षकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले 40 हजार रुपये चोरून नेले. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!