Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडकेवायसी अपडेट करून देतो म्हणत पाटबंधारेच्या कर्मचार्‍याला सव्वा लाखाला गंडविले

केवायसी अपडेट करून देतो म्हणत पाटबंधारेच्या कर्मचार्‍याला सव्वा लाखाला गंडविले


बीड (रिपोर्टर)- आपली केवायसी अपडेट करायची आहे, असे म्हणून एका भामट्याने पाटबंधारे विभागातील कर्मचार्‍याला 1 लाख 19 हजार 603 रुपयांना गंडविले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रविंद्र भुजंगराव हसेगावकर (वय 56, रा. धोंडीपुरा, टिळक रोड बीड) हे पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. त्यांना सोमवारी 6297276073 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला की, आपली केवायसी अपडेट करायची आहे, असे म्हणून भामट्याने त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्या खात्यातील 1 लाख 29 हजार 603 रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हसेगावकर यांनी काल शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

Most Popular

error: Content is protected !!