Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकेजमांजरा नदीच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर जमीन वाहून गेली

मांजरा नदीच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर जमीन वाहून गेली


केज/बीड (रिपोर्टर)- आठ दिवसांपूर्वी पडलेल्या धुव्वाधार पावसामुळे बीड जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झालं. लहान-मोठे तलाव पूर्णपणे भरले. नदीकाठच्या शेतीचं पुराच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालं. ज्या नदीचं पात्र मोठं आहे त्या ठिकाणची शेती अक्षरश: वाहून गेली. मांजरा नदीच्या काठी असणार्‍या शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून येथील शेती पिकासह वाहून गेल्याने शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं.


मांजरा धरणातून केज, धारूर, लातूर, उस्मानाबाद येथील नागरिकांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मध्यंतरी दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे या धरणात पाण्याचा साठा जमा होत नव्हता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मराठवाड्यात चांगला पाऊस पडत असल्याने मांजरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा जमा होऊ लागला. यंदाही पावसाची परिस्थिती पुर्वीपासून चांगलीच राहिली. दहा दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे छोटे-मोठे धरणे पूर्णत: भरले. मांजरा धरणही ओसांडून वाहिलं. धरणात अतिरिक्त पाण्याचा साठा जमा झाल्याने धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने याचा परिणाम आजुबाजुच्या शेतीवर झाला. नदीचे पाणी पात्रात बसलं नसल्याने शेतकर्‍यांची शेती वाहून गेली. शेकडो हेक्टरमधील पिकांचे नुकसान होऊन शेती खोदून गेल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.


शासन नुकसान
भरपाई देईल का?

अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकासोबतच शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने महसूल विभागाला दिले. शेतकर्‍यांना काही प्रमाणात मदतही जाहीर होईल मात्र ज्या शेतकर्‍यांची शेती वाहून गेली त्या शेतकर्‍यांना मदत मिळेल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!