Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यातील 1 लाख 14 हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश


पंधरा दिवसांनी पैशे व्यवस्थापन समित्यांना मिळणार

बीड (रिपोर्टर)- कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या, 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येणार आहेत. 1 लाख 14 हजार विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप होणार आहेत. येत्या पंधरा ते वीस दिवसात शिक्षण विभाग संबंधित व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांकडे पैशे वर्ग करणार असल्याचे समजते.


सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप केले जाते. यंदा मात्र जून महिन्यामध्ये शाळा सुरू होण्याऐवजी 4 ऑक्टोबरला शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना उशीरा गणवेश मिळणार आहेत. पंधरा ते वीस दिवसानंतर शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीच्या मुख्याध्यापकांकडे पैसे वर्ग करणार असून त्यानंतरच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!