Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडराज्य सरकारचं ‘मिशन कवचकुंडल’ दररोज पंधरा लाख लसी दिल्या जाणार

राज्य सरकारचं ‘मिशन कवचकुंडल’ दररोज पंधरा लाख लसी दिल्या जाणार

मुंबई (रिपोर्टर)- देशासह राज्यातही कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच देशात कोरोना लसीकरण मोहीमही राबवली जात आहे. अशातच आज घटस्थापनेच्या दिवशी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ’मिशन कवच कुंडलं’ (चळीीळेप घर्रींरलह र्घीपवरश्र)ची घोषणा केली आहे. दसर्‍यापर्यंत देशभरात 100 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं केंद्र सरकारचं उद्दीष्ट आहे. त्या दृष्टीकोनातून राज्यही प्रयत्नशील आहे. राज्यात दररोज 15 लाख लोकांना लस देण्याचं उद्दीष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. सध्या महाराष्ट्र सरकारकडे 1 कोटी लशींचा साठा असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!