Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडशिदोडमध्ये दोन गट आमने-सामने भिडले; तीन गंभीर, मारहाणीत तलवारीचा वापर

शिदोडमध्ये दोन गट आमने-सामने भिडले; तीन गंभीर, मारहाणीत तलवारीचा वापर


ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर)- हपश्यावर पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने भिडल्याने झालेल्या हाणामारीत दोन महिलांसह एकजण गंभीर जखमी झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत. ही घटना काल सकाळी सात वाजता तालुक्यातील शिदोड येथे घडली.


नितीन सर्जेराव भडगळे हे गावातील हप्श्यावर पाणी भरण्यासाठी काल सकाळी गेले असता तेथे बाळु बाबूराव जोगदंड याने ‘तु आमच्या दारासमोरील हप्श्यावर पाणी भरायचे नाही, असे म्हणून भडगळे यांना शिवीगाळ करत तलवार, लोखंडी गज, कुर्‍हाडीने मारहाण करत गंभीर जखमी केले. भडगळे यांना मारहाण होत असल्याचे त्यांची पत्नी आणि आई यांना समजल्यानंतर त्या भांडण सोडवण्यास गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत नितीन सर्जेराव भडगळे, शिवकन्या सर्जेराव भडगळे आणि अलका नितीन भडगळे हे गंभीर जखमी झो असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नितीन भडगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात बाळु बाबूराव जोगदंड, प्रियंका बाळु जोगदंड, बाबूराव रामा जोगदंड, सुनिल रामा जोगदंड, विनोद बाबूराव जोगदंड, रेखा विनोद जोगदंड (सर्व रा. शिदोड) यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!