दर्गाहला आणून पत्नीचा केला खून
चकलांबा येथे घडली घटना; पती स्वत: पोलिसांकडे स्वाधीन
बीड (रिपोर्टर): पत्नीला दर्गाहच्या दर्शनाला आणून त्याठिकाणी मुक्कामाला राहून रात्री तिच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना चकलांबा येथे घडली. घटनेनंतर पती स्वत: चकलांबा पोलिसांना स्वाधीन झाला. आपण आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने दिली. सदरील हा प्रकार कुठल्या कारणावरून घडला हे मात्र समजू शकले नाही. मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता.
शबाना शेख व शेरामत शेख (रा. आकतवाडा, ता. पैठण) हे पती-पत्नी गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील दर्गाहच्या दर्शनाला आले होते. त्याठिकाणी त्यांनी रात्री मुक्काम केला. रात्रीच्या दरम्यान पती शेरामत शेख याने आपली पत्नी शबाना शेख (वय 27 वर्षे) हिच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृणपणे खून केला. घटनेनंतर आरोपी पती स्वत:हून चकलांबा पोलिसांकडे स्वाधीन झाला. त्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता. खुनाची ही घटना नेमक्या कोणत्या कारणावरून घडली हे मात्र समू शकले नाही. या प्रकरणी पतीविरोधात चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.