Tuesday, January 25, 2022
No menu items!
HomeUncategorizedबायकोला नांदवयास का पाठवत नाही म्हणत सासुला मारहाण

बायकोला नांदवयास का पाठवत नाही म्हणत सासुला मारहाण


बीड (रिपोर्टर)- माझ्या बायकोला नांदवयास का पाठवत नाहीस , असे म्हणत जावयाने सासुला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना गेवराई तालुक्यातील सावरगाव येथे घडली. या प्रकरणी सासुच्या फिर्यादीवरून जावयाविरोधात गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत भाऊसाहेब वाघ (रा. सावरगाव) यांनी त्यांची सासू सुदामती ज्ञानदेव सानप (रा. सावरगाव) यांना त्यांच्या शेतात जावून ‘तुम्ही माझ्या बायकोला नादंवयाला का पाठवत नाहीत,’ म्हणत लिंबाच्या फोकाने मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी पोटात मारून गंभीर जखमी केले व ‘माझ्या पत्नीला नांदवयाला पाठवले नाही तर तुला जिवंत मारून टाकीन’ अशी धमकी दिली. या प्रकरणी सुदामती सानप यांनी गेवराई पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा जावई भागवत वाघ याच्या विरोधात कलम 324, 323, 504, 506, 507 भा.दं. वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!