Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमबीड ग्रामीण पोलीस करतय काय? ग्रामीण भागात सर्रास देशी, हातभट्टी दारूची विक्री

बीड ग्रामीण पोलीस करतय काय? ग्रामीण भागात सर्रास देशी, हातभट्टी दारूची विक्री


बीड (रिपोर्टर):- शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले. या व्यावसायांना आळा घालण्यास पोलीस प्रशासनाला सपशेल अपयश येत आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर अनेक गावात आणि रस्त्यावर हातभट्टी देशी दारूची सर्रासपणे विक्री होत आहे. या विक्रेत्यांना पोलीस अधिकारी आणि बीट अंमलदार यांचे आशिर्वाद असल्यामुळे हे विक्रेते दारूची विक्री करत आहेत. अशा दारू विक्रेत्यां विरोधात कारवाई होईल का नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कारवाई न करण्यामागचा बीड ग्रामीण पोलीसांचा उद्देश काय? हा सवालही उपस्थित होत असून याकडे जिल्हा पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी लक्ष देतील का?
बीड ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत अनेक गावे आहेत. या गावातील बहुतांश ठिकाणी देशी आणि हातभट्टी दारूची विक्री होत आहे. आजुबाजूच्या परिसरात दारू विक्री होत असल्याने याचा परिणाम नागरिकांवर होत असून तरूण मंडळी दारूच्या व्यसनी जात आहे. दारूची विक्री कोठे होती? आणि कोठ करतय? याची माहिती पोलीस अधिकार्‍यांना असते मात्र त्याच्यावर कारवाई केली जात नाही. सदरील दारू विक्रेता पोलीस अधिकारी आणि बीट अंमलदार यांच्याशी संधान साधून असतो. त्यामुळे कारवाई होत नाही. कारवाईच्या संदर्भात गावकर्‍यांनी तक्रारी केल्या तरी थातूर-मातूर कारवाई व्यतिरीक्त दुसरं काही होत नाही. काही ग्रामीण भागातील हायवे रस्त्यावर तर धाबे आणि हॉटेलमध्ये सुद्धा दारूची विक्री होत आहे. या विक्रेत्यांनाही पोलीसांचा आशिर्वाद असल्यामुळेच हे विक्रेते बिनधास्तपणे दारूची विक्री करत आहेत. ग्रामीण भागात पोलीसांच्या अशिर्वादामुळे दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याने यामुळे मारामार्‍याच्या घटनाही होवू लागल्या आहेत. दारू विक्री बंद करावी यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांनी पुढाकार घेवून बीड ग्रामीण पोलीसांना दारूची विक्री बंद करण्यासाठी काही डोस द्यावे अशी मागणी केली जात आहे.
चौकट
धाबेवाले करत असतात पाहुणचार!
धाबा खानावळीसाठी असतो मात्र धाब्यावर सर्रासपणे अनाधिकृत देशी, विदेशी दारूची विक्री होते. या दारूतून दररोज मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. काही लालची पोलीस कर्मचारी धाब्यात पाहूणचार घेवून येत असतात. धाब्यात पाहुणचार घेणारे पोलीस धाब्यावर काय कारवाई करणार?
चौकट
टपर्‍यांवर दारू मिळू लागली
दारू विक्रीबाबत पोलीस प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने कोणीही उठतय आणि दारू विक्री सुरू करतेय. काही गावांमध्ये साध्या टपरीवर देशी आणि विदेशी दारूची विक्री होते तर काही लोक घरामध्ये दारूचे बॉक्स ठेवून दारूची विक्री करत आहेत. अशा पद्धतीने दारूची विक्री होत असेल तर कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस नेमकं कुठल्या भूमिकेत असतात अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!