Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीत 13 जिल्ह्यात 38 पॉझिटिव्ह

आष्टीत 13 जिल्ह्यात 38 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात दुसरी लाट ओसरली असल्याने सणोत्सव साजरे करण्यासाठी शर्शत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना काळात प्रथमच मंदिरे उघडली असून सार्वजनिक ठिकाणी घटस्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी सणोत्सव काळात कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. आजच्या अहवालात आष्टी तालुक्यात 13 तर जिल्ह्यात 38 जण पॉझिटिव्ह आढळून आले.


आरोग्य विभागाला शुक्रवारी 1706 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 38 जण बाधित आढळून आले आहेत तर 1 हजार 668 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 7, आष्टी 13, बीड 3, धारूर 1, केज 3, माजलगाव 4, परळी 2, पाटोदा 3 आणि शिरूर तालुक्यात 2 रूग्ण आढळून आले आहेत. सणोत्सव काळात नागरिकांनी गर्दी न करता कोरोनाचे नियम पाळून दर्शन घ्यावे. नवरात्र उत्सव मंडळाने कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन न करता आरोग्य विषयक शिबीर घेवून प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!