Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनातीन दिवसात आठ कोरोना बाधितांचा मृत्यू शनिवारी बीड जिल्ह्यात 34 पॉझिटिव्ह

तीन दिवसात आठ कोरोना बाधितांचा मृत्यू शनिवारी बीड जिल्ह्यात 34 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात असली तरी उपचार घेणार्‍या रुग्णांचा गेल्या तीन दिवसात मृत्यू आकडा 8 वर पोहचल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या तीन दिवसात बीड जिल्ह्यात 8 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. बुधवार दि. 6 रोजी उपचार घेत असलेल्या 4, गुरुवारी दि. 7 रोजी 2, तर काल शुक्रवार दि. 8 रोजी दोघा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात 8 कोरोना बाधितांच्या बळीची नोंद असून जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या आता 2 हजार 782 वर जावून पोहचली आहे. दुसरीकडे आज आरोग्य विभागाला शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या 1 हजार 903 संशयीतांच्या अहवालामध्ये 34 जणांना कोरोनाची लागण झाले असून 1 हजार 869 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 6, आष्टी 11, बीड 3, धारूर 3, गेवराई 4, माजलगाव 3, परळी 1 आणि पाटोदा तालुक्यात 3 रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!