Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडशहेंशाहवली दर्गाचा आज संदल आ. विनायक मेटे यांनी चढवली चादर

शहेंशाहवली दर्गाचा आज संदल आ. विनायक मेटे यांनी चढवली चादर


सोशल डिस्टन्सचे पालन करावे -जहीर कादरी
बीड (रिपोर्टर)- बीड शहरातील हजरत शहेंशाहवली दर्गाचा आज संदल असून यानिमित्ताने आ. विनायक मेटे यांनी चादर चढवून दर्शन घेतले. या वेळी केजीएन ग्रुपचे अध्यक्ष सय्यद जहीरुद्दीन कादरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. दरम्यान, संदल निमित्त दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन जहीर कादरी यांनी केले आहे.


कोरोनाचा संसर्ग असल्याने यावर्षी अगदी साध्या पद्धतीने हजरत शहेंशाहवली दर्गाचा संदल साजरा करण्यात आला. आज सकाळी आ. विनायक मेटे यांनी दर्गाला चादर चढवून दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या समवेत केजीएन ग्रुपचे प्रदेश अध्यक्ष सय्यद जहिरुद्धीन कादरी, सुहास पाटील, शेषेराव तांबे, शकील खान, कलीम खान, अनवर खान, शेख लतिफ, अकबर कादरी, अदनान मिर्झा, कुतुबभाई, लालाभाई, अझहरभाई, आबेदभाई, हरुण पटेल, सय्यद समी, मुन्ना इनामदार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. दरम्यान, भावीकांनी संदल निमित्त दर्शन घेताना सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन जहीर कादरी यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!