Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडउद्या बीड जिल्हा बंद, केंद्राच्या निषेधार्थ बंदमध्ये सहभागी होण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे आवाहन

उद्या बीड जिल्हा बंद, केंद्राच्या निषेधार्थ बंदमध्ये सहभागी होण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे आवाहन


बीड (रिपोर्टर)- उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील आंदोलक शेतकर्‍यांच्या अंगावर मंत्री पुत्राने गाडी घालून हत्या केल्या प्रकरणी केेंद्र सरकारच्या निषेधार्थ राज्यातील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस पक्षांनी उद्या बंद पुकारला असून या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.
केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या विरोधात भूमिका घेत असून शेतकर्‍यांच्या न्याय हक्काच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. कधी शेतकर्‍यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवले जाते तर कधी सत्ताधार्‍यांकडून शेतकर्‍यांना ‘साले’ म्हणून संबोधले जाते. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेर येथील आंदोलक शेतकर्‍यांवर अजय मिश्रा यांच्या काफिल्यातीलच नव्हे तर त्यांच्या पुत्राच्या गाडीने 8 जणांना चिरडले. यामध्ये शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. सदरची घटना अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या अनुषंगाने राज्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीने यात सहभाग नोंदवला असून उद्या बीड जिल्हा शंभर टक्के बंदचे आवाहन पदाधिकार्‍यांनी केले आहे.

उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा -भाई बाळासाहेब घुमरे
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळासाहेब घुमरे, सय्यद शाकेर, सय्यद गफ्फार, विष्णूपंत घोलप, अभी लोंढे, शेख राजू, भाई राजेंद्र नवले, इमरान शेख, सौरभ संगेवार, वाल्मिक कदम, लक्ष्मण सोळंके, कृष्णा काळे यांनी केले आहे.


महाविकास आघाडीच्या वतीने
सोमवारी परळी बंदचे आवाहन

परळी : लखीमपूर शेतकरी हत्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देश आणि राज्यातील विरोधक एकवटले आहेत. शेतकर्‍यांना चिरडून मारल्याचा निषेधार्थ येत्या सोमवार 11 ऑक्टोबरला ’महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.त्यात मोठ्या
संख्येने सहभागी व्हा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बहाद्दुर भाई, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते आदींनी केले आहे.
भाजपच्या हाती सत्ता आहे म्हणून त्यांच्याकडून होणारा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसत आहे. शांततेच्या मार्गाने निदर्शने करणार्‍या शेतकर्‍यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी गाड्या घातल्या आहेत. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्यांना शेतकर्‍यांबद्दल काय आस्था नाही. शेतकर्‍यांच्या अंगावर गाड्या घालून भाजपा कार्यकर्त्यानी शेतकर्‍यांची हत्या केली आहे. शेतकर्‍यांची हत्या करण्याचा निर्णय घेणार्‍या या भाजप सरकारचा विरोध करण्यासाठी ’महाराष्ट्र बंद’चा निर्णय घेतला आहे.
या बंदबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते कॉ. पी. एस. घाडगे सरांशी संपर्क साधला असता त्यांनी 11 ऑक्टोबरच्या बंदला पाठिंबा दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!