Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडवीज अंगावर पडून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

वीज अंगावर पडून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू


गेवराई (रिपोर्टर)- शेतातून घरी येताना अंगावर वीज पडल्याने 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील निपाणी जवळका येथे शनिवारी संध्याकाळी घडली.


काल गेवराई शहर व परिसरात जोराचा वारा सुटला होता. या वेळी ढगांचा कडकडाट होऊन अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. निपाणी जवळका येथे दिवसभर काम करून घराकडे परतणार्‍या एका 45 वर्षीय महिलेच्या अंगावर वीज पडल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मिना मच्छिंद्र लोणकर असे मयत महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मिना यांना नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शेळके, पो.कॉ. अमोल खटाने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Most Popular

error: Content is protected !!