Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडपोलीसांची देशी, हातभट्टी दारूवर धाड केज, नेकनूर हद्दीत केली कारवाई

पोलीसांची देशी, हातभट्टी दारूवर धाड केज, नेकनूर हद्दीत केली कारवाई


नेकनूरमध्ये चार अटक दोन फरार; केजमध्ये एकास ताब्यात घेतले
केज/नेकनूर (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये अवैधरित्या देशी, विदेशी आणि हातभट्टी दारूची विक्री होत आहे. या विक्रीकडे स्थानिक पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. आज पहाटे केज येथील कांचन हॉटेलवर पोलीसांनी धाड टाकून 2800 रूपयाची दारू जप्त केली तर नेकनूूर हद्दीमध्ये पाच ठिकाणी हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून हजारो रूपयाचे रसायन नष्ट करण्यात आले. या धाडी प्रकरणी संबंधिताविरोधात कारवाई करण्यात आली. दरम्यान नेकनूरच्या कारवाईमध्ये चार जणांना अटक केली असून दोघे जण फरार आहेत.

केज येथील सिंदी फाटा येथे असलेल्या कांचन हॉटेलवर पहाटे चार वाजता पीएसआय शिंदे, गीते, अहंकारे, गायकवाड यांनी धाड टाकून 2800 रूपयाची दारू जप्त केली. या प्रकरणी लक्ष्मण सिरसट रा.सिंदी याला पोलीसांनी ताब्यात घेतले. नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही आज कारवाई झाली. लिंबागणेश, बोरखेड, येळंबघाट. चौसाळा, कळसंबर या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून हातभट्टी दारूची विक्री होत आहे. पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी सदरील तीनही ठिकाणी धाडी टाकून हजारो लीटर रसायन नष्ट केले. यात चौघा जणांना अटक केली असून दोघे जण फरार आहेत. ही कारवाई पोलीस निरक्षक शेख मुस्तफा,पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, दिपक खांडेकर, सुशांत सोनवणे, अमोल नवले, प्रशांत क्षीरसागर, ढाकणे, कांबळे, होमगार्ड मुंतजीप अत्तार, इम्रान यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!