Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकेज84 गावांचा भार 45 पोलीस कर्मचार्‍यांवर

84 गावांचा भार 45 पोलीस कर्मचार्‍यांवर


संख्याबळ कमी असल्याने कर्मचार्‍यांची उडते तारांबळ
केज (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणेअंतर्गत कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्यामुळे कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडतो. केज पोलीस ठाणेअंतर्गत 84 गावांचा समावेश आहे. या 84 गावांसाठी फक्त 45 पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याने आणखी पोलीस कर्मचारी वाढवण्यात यावे, जेणेकरून या कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडणार नाही.


वाढती लोकसंख्या पाहता पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्यात येत नसल्याने आहे त्या कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडतो. बीड जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. केज पोलीस ठाणेअंतर्गत 84 गावांचा समावेश आहे. या 84 गावांसाठी फक्त 45 कर्मचारी कार्यरत असून या कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. वाढती गुन्हेगारी पाहता कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्याची सातत्याने मागणी होत असली तरी गृहविभागाकडून मात्र याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!