Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमपोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोघांना तलवारीने मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोघांना तलवारीने मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

बीड (रिपोर्टर)

बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. पोलिसांचा गुन्हेगारावर धाकच राहिला नाही. रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोघा जणांना चार ते पाच जणांनी तलवारीने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. सदरील हा मारहाणीचा प्रकार कुठल्या कारणावरून घडला हे मात्र समजू शकले नाही. याबाबत पोलीस प्रशासन मात्र काहीही सांगायला तयार नाही.

बीड शहरासह जिल्हाभरात गुंड प्रवृत्ती वाढू लागली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू लागला. पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याने मारामार्‍याच्या घटना वाढू लागल्या. रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अखिल खान झहिर खान, कफिल खान झहिर खान (रा.शहेंशाहवली दर्गा) या दोघांना मारहाण करण्यात आली. यात हे दोघे गंभीर जखमी झाले. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेने बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलीस प्रशासन मात्र या गंभीर घटनेबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. सदरील हा मारहाणीचा प्रकार कुठल्या कारणावरून घडला हे मात्र समजू शकले नाही.

Most Popular

error: Content is protected !!