Friday, January 28, 2022
No menu items!
Homeशेतीमोदी सरकारच्या निषेधार्थ आ.बाळासाहेब आजबेंच्या नेतृत्वाखाली कडकडीत बंद

मोदी सरकारच्या निषेधार्थ आ.बाळासाहेब आजबेंच्या नेतृत्वाखाली कडकडीत बंद


मोदी शाह हाय हाय, शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेल्या सरकारच करायच काय खाली मुंडक वर पाय जोरदार घोषणांनी परिसर दणाणला; उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील शेतकर्‍यांवर केलेला अन्याय निंदनीय प्रकार-आ.आजबे
आष्टी(रिपोर्टर): उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज,11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय या बंदला आष्टी तालुक्यात कडकडीत बंद पाळून प्रतिसाद देण्यात आला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंद पाळण्यात आला यावेळी आ. बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालयापासून मोटार सायकल रॅली तहसिल कार्यालयापर्यत काढून मोदी शहा हाय हाय, शेतक-यांच्या मुळावर उठलेल्या सरकारच करायच काय खाली मुंडके वर पाय अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या व तहसिलदार शारदा दळवी यांना निवेदन दिले.


आष्टी तालुक्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने या सहभागी झाले होते. मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी आ. बाळासाहेब आजबे, मा.आ. साहेबराव दरेकर, युवा नेते यश आजबे, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, भाऊसाहेब लटपटे, सुनिल नाथ, शिवाजी राऊत, तालुकाध्यक्ष भाऊ घुले, युवकचे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब गर्जे, राम खाडे, काका शिंदे, संदिप आस्वर, किशोर हंबर्डे, विनोद निंबाळकर, अ‍ॅड.शार्दुल जोशी, अतुल शिंदे, मा.सरपंच जालिंदर गायकवाड, संदिप सुंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश शिंदे, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब वाघुले, अशोक पोकळे, सरपंच उदमले, नाजीम शेख, आदी कार्यकर्ते महाविकास आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पोलीसांचा चोख बंदोबस्त
महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र पुकारलेल्या बंदला आष्टी तालुक्यात पोलीसांचा चोख बंदोबस्त असून दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे.पोलिस प्रशासन दक्ष आहे.
-सलिम चाऊस
(पोलिस निरीक्षक, आष्टी )

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!