Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावकेंद्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदला माजलगावमध्ये संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदला माजलगावमध्ये संमिश्र प्रतिसाद


माजलगाव (रिपोर्टर)लाखीमपुर येथे देशातील शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या गाड्या ने शेतकर्‍यांना चिरडून मारले या आरोपींना फाशी द्या आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ दि.11 आँक्टोबर सोमवार रोजी पिडीतांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी आणि संयुक्त किसान कामगार मोर्चा च्या वतीने महाराष्ट्र बंदचे आव्हाण केले होते. याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील आंबेडकर चौक ते संभाजी महाराज चौकापर्यंत यावेळी आली काढत बंदचे आवाहन करण्यात आले.

या रॅलीमध्ये शिवसेनाकार्यकर्ते, माकप , राष्ट्रवादी, काँग्रेस, काँग्रेस आय, मानवी हक्क अभियान, महाविकास आघाडी संयुक्त किसान कामगार मोर्चा यांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंह सोळंके, शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहन जाधव, माकप तालुका सचिव बाबा सर, काँग्रेस चे नारायण होके, दत्ता कांबळे, तुकाराम येवले, विश्वंभर थावरे, राजेश घोडे, नारायण गोले, रमेश सोळंके, डीवायएफआयचे एड. सय्यद याकुब, विनायक चव्हाण, रशीद शेख, सिद्धार्थ ससाने, फारुख सय्यद, नासेर खान, दुसेन सोळंके, सादेक पठाण, अशोक आळने आदी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!