Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडधारूरधारूरमध्ये रॅली काढून व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्याचे केले आवाहन

धारूरमध्ये रॅली काढून व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्याचे केले आवाहन


किल्लेधारूर (रिपोर्टर) महाराष्ट्र बंदला आज धारूर शहरांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले तसेच सोमवारी आठवडी बाजार असल्याने व्यापार्‍यांनी काही वेळ आपली दुकाने बंद ठेवून नंतर दुकाने उघडल्याचे दिसून आले.

केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इंदिरा काँग्रेस यांनी केंद्र शासनाच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवावा असे आवाहन केले होते परंतु याला धारूर शहरांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे सकाळी काही वेळ दुकाने बंद अवस्थेत होती त्यानंतर नऊच्या नंतर थोडी दुकाने उघडली गेली त्यावेळी महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस यांच्या पदाधिकार्‍यांनी सर्व व्यापारी वर्गाला रॅली काढून ही दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले याला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे लॉक डाऊन असल्याने अगोदरच व्यापारीवर्ग परेशान आहे तसेच सोमवार धारूर शहरामध्ये आठवडी बाजार असतो यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक खरेदीसाठी शहरांमध्ये येतात यामुळे आज धारूर शहरामध्ये महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना व इंदिरा काँग्रेस यांच्या पदाधिकार्‍यांनी शिवाजी चौक ते मेन रोड अशी रॅली काढून शेवटी शिवाजी चौकामध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या केंद्रशासनाने शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नये शेतकर्‍यां प्रति केंद्र शासनाची भूमिका ही अतिशय निराशाजनक असल्याचे पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Most Popular

error: Content is protected !!