Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडकेजकेज कडकडीत बंद, तहसीलवर मोर्चा

केज कडकडीत बंद, तहसीलवर मोर्चा


केज (रिपोर्टर):- उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खेरी येथे चार शेतकर्‍यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज बंदचे आवाहन करण्यात आल्याने या बंदला केजमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. कंाँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आंदोनलकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, नगराध्यक्ष आदित्य पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

उत्तर प्रदेश घटनेच्या निषेधार्थ आज बंद असून केज शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी बंदमध्ये उर्त्स्फुत सहभाग नोंदवला. शहरातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भवानी चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. सदरील या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे नेते तथा नगराध्यक्ष आदित्य पाटील, राहुल सोनवणे, पशुपतीनाथ दांगड, शिवसेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, रत्नमाला मुंडे, शेकापचे भाई मोहन गुंड, संतोष यादव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!