Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईगेवराईत व्यापार्‍यांची गोची, पंडितांकडून बंदचे तर पवारांकडून दुकाना उघडण्याचे आवाहन

गेवराईत व्यापार्‍यांची गोची, पंडितांकडून बंदचे तर पवारांकडून दुकाना उघडण्याचे आवाहन


गेवराई (रिपोर्टर) – गेवराई (रिपोर्टर)- लखीमपूर खैरी येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असतानाच गेवराईमध्ये मात्र बंदवर मोठं राजकारण झाल्याचं चित्र स्थानिक नेतृत्वातून दिसून आलं. राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांनी बंदबाबत रॅली काढून व्यापार्‍यांना आवाहन केल्यानंतर बंद झालेली गेवराई विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे रस्त्यावर उतरून व्यापार्‍यांना दुकाना उघडण्याबाबत आवाहन करत होते. त्यामुळे व्यापार्‍यांची गोची होत दुकाना उघडण्यात आल्या. तर या बंदमध्ये स्थानिक शिवसेना दुपारपर्यंत कोठेही दिसली नाही. आ. लक्ष्मण पवार या वेळी बोलताना म्हणत होते, एकीकडे कोविडमुळे उद्योग धंदे बसले असताना पुन्हा दुकाना बंद करून महाविकास आघाडी लोकांवर उपासमारीची वेळ आणत आहे. शेतकर्‍यांना अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याचं पाप हे सरकार करत आहे. हे पाप झाकण्यासाठीच हा बंद असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात महाविकास आघाडीच्या आज युपी मधील लाखमीपुर घटनेच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या विरोधात बंद पाळण्यात येत आसून याच धर्तीवर आज गेवराई येथे सकाळपासून राष्ट्रवादीच्या वतीने विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शहरात सर्वत्र फेरी काढून व्यापार्‍यांना बंद चे आवाहन करण्यात येत होते. मात्र आमदार लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या पाठोपाठ रस्त्यावर उतरून शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर फिरून व्यापार्‍यांना पुन्हा दुकाना उघडायला लावून कुणाच्या भीतीने आपल्या दुकाना बंद न करता चालू ठेवाव्यात असे आवाहन केल्यानंतर सर्व व्यापार्‍यांनी आपले दुकाना उघडून व्यवहार सुरू केले. दरम्यान आ.पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत शहरातील शिवाजी चौक, शास्त्री चौक, मेन रोड मार्गे मोंढा नाका, जालना रोड, आंबेडकर चौक जुने बस्थानक, नवीन बस्थानक मार्गे, बाजारातळ अशी शहरात पायी फेरी मारत व्यापार्‍यांना दुकाना उघडण्याचे अवाहन केले. यानंतर व्यापार्‍यांनी खुलेआम आपल्या दुकाना उघडल्याचे दिसून आले.
यावेळी त्यांच्यासमवेत जि.प.सदस्य, पं.स. सभापती,सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!