Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद


बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी, आष्टी, पाटोदा, धारूर, केजमध्ये संमिश्र प्रतिसाद
बीड (रिपोर्टर)- देशातला शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना आपल्या न्याय-हक्काच्या मागण्यांसाठी तो रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागला तेव्हा भाजपाच्या मंत्री पुत्राकडून त्यांना गाडीने चिरडण्यात आले. याचा संताप देशभरातील शेतकर्‍यात असून आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद असून बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा,परळी, अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी, बीड तालुक्यात कडकडीत बंद दिसून आला तर धारूर, गेवराईत संमिश्र बंद पहावयसा मिळाला. गेवराईमध्ये राष्ट्रवादीने बंदचे आवाहन करण्यासाठी रॅली काढली. त्यापाठोपाठ भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी दुकाना उघड्या करण्याबाबत रस्त्यावर उतरून व्यापार्‍यांना आवाहन केल्याने गेवराईत व्यापार्‍यांची गोची पहायला मिळाली.


आज सकाळी बीड शहरातून राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी शहरात रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याबाबत व्यापार्‍यांना आवाहन केले. आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वात एक रॅली आणि शिवसेनेच्याच गणेश वरेकर, बप्पा घुगे, हनुमंत जगताप यांच्या नेतृत्वात आणखी एक रॅली बीडमधून काढण्यात आली होती. काँग्रेसकडून बंदसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौनव्रत आंदोलन रविंद्र दळवी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आ. संदीप क्षीरसागर यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले.

Most Popular

error: Content is protected !!