Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडआरोग्य कर्मचार्‍यांवर विकत पाणी घेण्याची वेळ

आरोग्य कर्मचार्‍यांवर विकत पाणी घेण्याची वेळ


सार्वजनिक बांधकाम विभागाने पाईप लाईन खोदून पंधरा दिवस लोटले तरी काम होईना
बीड (रिपोर्टर):- जिल्हा रूग्णालयातील आरोग्य कर्मचार्‍यांसाठी बशीरगंज भागात असलेल्या क्वार्टरमध्ये घाण पाणी येत असल्याने तेथील पाईप लाईनचे काम सुरू करण्यात आले. मात्र पंधरा दिवस लोटले तरीही हे काम पुर्ण होत नसल्याने कर्मचार्‍यांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे.


गेल्या काही दिवसापासून आरोग्य कर्मचार्‍यांच्या क्वार्टरमध्ये घाण पाणी येत असल्याने येथील कर्मचार्‍यांनी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर येथील पाणी पुरवठा बंद करून पाईप लाईन दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले. मात्र हे काम संतगतीने आणि निकृष्ठ दर्जाचे सुरू आहे. काम संतगतीने असल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून येथील कर्मचार्‍यांना विकतचे पाणी घ्यावे लागते. पाईपलाईनचे काम दर्जेदार व तात्काळ पुर्ण करावे अशी मागणी आरोग्य कर्मचारी प्रकाश गायकवाड यांच्यासह आदींनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!