Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडबीड, माजलगावमध्ये भटके विमुक्त आघाडीचे धरणे आंदोलन

बीड, माजलगावमध्ये भटके विमुक्त आघाडीचे धरणे आंदोलन


बीड (रिपोर्टर)- अनुसूचित जाती-जमाती प्रमाणे भटक्या विमुक्तांना लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकरीत आरक्षण देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. माजलगावमध्येही धरणे आंदोलन संपन्न झाले.

345 copy


भटके विमुक्तांच्या मागण्या शासन पुर्ण करत नसून शासनाने भटक्या विमुक्तांच्या प्रश्‍नाबाबत योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. आज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. भटक्या विमुक्तांना लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकरीत आरक्षण, राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण देण्यात यावे तसेच भटकंती करणार्‍या या समाजासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा लागू करण्यात यावा, अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सदरील या आंदोलनात डॉ. लक्ष्मण जाधव यांच्यासह आदींचा सहभाग होता. माजलगाव येथेही भटके विमुक्त संघटनेच्या वतीने आंदोलन झाले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!