Monday, January 24, 2022
No menu items!
Homeक्राईमचोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद आज दुपारची घटना

चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद आज दुपारची घटना


बीड (रिपोर्टर)- जिल्हा परिषदेच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकलला लटकवलेली बॅग दिवसाढवळ्या एका चोरट्याने चोरून नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेने शहरात पोलिसांचा गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक राहिला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर एक मोटारसायकल उभी होती. या मोटारसायकलला एक बॅग होती. ती बॅग अज्ञात चोरट्याने आज दुपारी चोरून नेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. छायाचित्रातील चोरटा कोणास आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

Most Popular

error: Content is protected !!